बृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबई

२४ तास उलटले तरी दिव्यांश अद्याप बेपत्ता

गोरेगावमध्ये बुधवारी रात्री तीन वर्षाचा दिव्यांश उघड्या गटारात वाहून गेला. जवळपास २४ तास उलटले तरी तो अद्याप सापडलेला नाही. मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या अक्षरश: जीवावर उठला आहे. त्यात महापौर विश्वानाथ म्हाडेश्वर यांनी याला नागरिकच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गटावरचे झाकट काढून टाकण्यास नागरिकांचा हात आहे, असा दावा केला.

दिव्यांश ज्या गटारात पडला ते गटार ३ ते ४ फूट खोल होते. त्यातच पावसामुळे पाण्याचा प्रवाह जोरात होता. गेली दोन वर्षं या गटारावर झाकण नसल्याचे पुढे आले. स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button