Maharashtra GovPoliticsमुंबई

विरोधकांना टोला लगावत संजय राऊतांचा शायराना अंदाज

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना आणि विरोधकांच्या आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निकालाच्या दिवशी राऊत यांचा शायराना अंदाज दिसून आला नसला तरी आज सकाळीच त्यांनी ‘संजय ऊवाच’ या मथळ्याखाली एक शेर ट्विट केला आहे.

“उनसे कहना की किस्मत पे इतना नाज ना करे… हमने बारिशों में भी जलते हुए मकान देखे है…” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. तसेच या ट्विटखाली त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ असंही लिहिलं आहे. हे ट्विट नक्की कशासंदर्भात आहे याबद्दल राऊत यांनी थेट उल्लेख केलेला नसला तरी ‘जय महाराष्ट्र’ या शब्दांवरून हे ट्विट सुशांत प्रकरणावरून असल्याचे स्पष्ट होते आहे.

दरम्यान सुशांत सिंह मृत्युप्रकरणामध्ये सीबीआय चौकशीची गरज नव्हती, मात्र बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे राजकारण केले जात असल्याचे शिवसेनेचे खासदार राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर म्हटले होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button