मागील २४ तासात ३ हजार कोरोना रुग्णांची वाढ !
मुंबई: शनिवारी कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून कोरोना मुक्त संख्येपेक्षा ही अधिक आहे. राज्यभरात शनिवारी ३ हजार ६११ नवे कोरोनारुग्ण आढळून आले असून त्या तुलनेत फक्त १ हजार ७७३ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या लोकांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या शिवाय ३८ जणांचा मृत्यू देखी झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित लोकांची संख्या २० लाख ६० हजार १८६ वर पोहचली आहे.
ANI च्या सांगण्यानुसार महाराष्ट्र ३,६११ नवीन रुग्ण तर १,७७३ लोक कोरोना मुक्त झाले असून तसेच ३८ कोरोनामुळे मृत्यू झाले ही माहिती त्यांनी महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातून घेतली आहे.
काहीच दिवसांपूर्वी अमरावती मध्ये झालेल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे हा आलेख आणि ही संख्या वाढली असल्याची शक्यता आहे. रिकव्हरी रेट हा जरी ९५ टक्के असला तरी नागरिकांनी मास्क वापरणे आणि सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करणे महत्वाचे आहे
काहीच दिवसांपूर्वी इंग्लंड मध्ये सुद्धा कोरोनाचा उद्रेक पुन्हा झाला असल्याने ही परिस्थिती भारतात येऊ नये या साठी काळजी घेणे महत्वाचे आहे.
