Sportsक्रिकेटक्रीडा

म्हणून रविचंद्रन अश्विनने मागितली हरभजन सिंगची माफी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर ऑल आऊट केलं. त्यामुळे दुसऱ्या डावात 195 धावांच्या आघाडीसह 54 धावा केल्या. यामुळे भारताने दुसऱ्या दिवसखेर 249 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात लोकल बॉय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

रविचंद्रन अश्विन ने हरभजन सिंह ला मागे टाकलं आहे. भारतीय मैदानावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.  अश्विनने दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफ स्पिनने बेन स्टोक्स ला आऊट केलं. यानंतर हरभजन सिंहला मागे टाकत स्वतःच्या नावे 28.76 सरासरीत 265 विकेट नोंदवल्या. घरगुती मैदानावर अश्विनने 266 विकेट घेतल्या. 

अश्विनने आपल्या सीनिअर गोलंदाजाचा रेकॉर्ड तोडल्यानंतर हरभजन सिंहची माफी मागितली आहे. ‘जेव्हा मी 2001 मध्ये हरभजनला खेळताना पाहिलं तेव्हा मी विचार केला नव्हता की मी ऑफ स्पिनर म्हणून खेळेल.  मी तेव्हा माझ्या राज्यासाठी खेळत होतो. आणि फलंदाजीत मला माझं करिअर करायचं होतं. 

आतापर्यंत 76 टेस्टमध्ये 25.26 सरासरीने एकूण 391 विकेट घेतल्या आहेत. 34 वर्षीय अश्विनने म्हटलं की,’त्या वयाचे माझे सर्व खेळाडू मस्करी करायचे. कारण मी तेव्हा भज्जी पा सारखं गोलंदाजी करायचो. अशा परिस्थितीत आता त्यांचा रेकॉर्ड तोडणं हे माझ्यासाठी खूप खास आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button