IPL लिलाव 2021 मध्ये जरी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूपासून ते अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा जलवा पाहायला मिळाला. या दरम्यान प्रत्येकजण त्या खेळाडूच्या खरेदीची वाट पहात होता ज्याने वरिष्ठ पातळीवर फक्त दोन घरगुती सामने खेळले आहेत.
आयपीएलच्या यंदाच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघानं आपल्या चमूमध्ये सहभागी केलं आहे. पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे.
अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरला संघात स्थान मिळणार का? याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
🚨 आला रे 🚨
Arjun Tendulkar 🇮🇳
💰: ₹ 20 Lakhs#OneFamily #MumbaiIndians #IPLAuction— Mumbai Indians (@mipaltan) February 18, 2021
