Maharashtra Gov

मुंबईच्या महापौरांची कोरोनाकाळात लोकल सफारी

मुंबई: कोविड-१९ संबंधित खबरदारी न घेतल्यास शहर दुसर्‍या लॉकडाऊनकडे जाऊ शकते असा इशारा दिल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करून प्रवाशांना मास्क घालण्याची विनंती केली.
 
 “नागरिकांनी कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही तर राज्य सरकारला दुसरे लॉकडाऊन घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. नागरिकांनी योग्य मास्किंग, सॅनिटायटेशन आणि सामाजिक अंतर कायम ठेवले पाहिजे हे सुनिश्चित करणे. ” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. प्रवाश्यांनी मास्क घालावे यासाठी महापालिकेने प्रभाग स्तरावर पथकेही तयार केली आहेत.
 
 राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा करोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि प्रतिबंधात्मक नियम धुडकावून शहरात ठिकठिकाणी होणारी गर्दी यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
 
या पार्श्वभूमी बृहन्मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकलमधून प्रवास केला असून महापौरांनी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धिम्या गतीच्या लोकलने प्रवास केला. त्याचबरोबर रेल्वे स्थानकावरही फेरफटका मारला. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसमोर महापौरांनी मास्क घालून फिरा असे आवाहन केले आणि त्यांना विनंती केली.
 
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या सरासरी ४०० होती. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या पुन्हा पाचशेपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाबरोबरच राज्य सरकारही सर्तक झाले आहे. राज्य सरकार व महापालिका प्रशासन गर्दी कमी करण्याच्या दिशेने पावलं टाकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे घराबाहेर पडल्यानंतर अनेक नागरिक मास्क आणि इतर करोना संबंधित सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलं आहे.
 
नागरिकांनी त्रिसूत्री नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शासनाच्या नियमांचे पालन केले तरच कोविड १९ आटोक्यात येईल असे शासनाचे म्हणणे आहे परंतु लोकांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पुन्हा लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button