कोरोना अपडेट : राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा खाली !
मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण आढळले असून त्याचवेळी ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोना मृत्यूंचे प्रमाणही आज कमी झाले आहे. राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्रमुख शहरांत निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्येचा आकडा काहीसा खाली आल्याचे पाहायला मिळत आहे.
रविवारी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून संवाद साधला. त्याच्यानंतर जर नागरिकांनी ८ दिवसात जर नियम पाळून दाखविले नाही तर नंतर कदाचित लॉकडाऊन लावण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आजपर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ५४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यसरकारने आता करोनामुळे नागरिकांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, शहरात नागरिकांवर पोलीस हे कडक लक्ष ठेऊन आहेत आणि नियम मोडणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.