Corona Updates

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना अलर्ट !

दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे तर आता राजधानीत सुद्धा दिल्ली सरकारने कोरोना अलर्ट जाहीर केलाय. बाकीच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी दिल्ली सरकारने असा नियम काढलाय की कोरोना चाचणी नकारात्मक आल्याशिवाय दिल्लीत प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब या ५ राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची आरटी -पीसीआर टेस्ट ही नकारात्मक आल्याशिवाय प्रवेश करू नये असे सांगण्यात आले. ट्रेन, बस, किंवा विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही सूचना आहे. जे पहिलेच दिल्लीत आले आहेत त्यांनी लवकरच स्वतःची चाचणी करून घ्यावी असेही आवाहन दिले आहे.

माहितीनुसार, हा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला कारण या पाचही राज्यात मागील काही दिवसांपासून करून बाधितांची संख्या वाढली आहे. आठवड्यात या राज्यांतून व्हायरसच्या 86 टक्के घटना समोर आल्या आहेत. या राज्यांमधील प्रवाशांना दिल्लीकडे जाण्यापूर्वी 72 तास आधी घेतलेल्या चाचण्यांविषयी कोविड नकारात्मक अहवाल आहे की नाही पडताळून पाहून मगच प्रवेश दिला जाईल. शुक्रवारी मध्यरात्री ते 15 मार्च दुपारी 12 वाजेपर्यंत हा नवीन नियम लागू होईल, असे माहितीनुसार कळते.

मंगळवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 5,210 नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यानंतर केरळमध्ये 2,212 आणि तामिळनाडूमध्ये 449 नोंद झाली आहे. महाराष्ट्रात १८ मृत्यू आणि केरळमध्ये १६ मृत्यू आणि पंजाबमध्ये १५ मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button