मनोरंजन

आमिर खाननं घेतला ‘महाभारत’ चित्रपट बंद करण्याचा निर्णय

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान प्रत्येक चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसतो. हेच कारण आहे की त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. आमिर मागच्या दोन वर्षांपासून त्याचा ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’ चित्रपटावर काम करत आहे. पण आता अचानक आमिरनं हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या मते हा चित्रपट करण्याची ही योग्य वेळ नाही. तर सूत्रांच्या माहितीनुसार सध्या पौराणिक कथांवर आधारित चित्रपटांबाबत होणारे वाद टाळण्यासाठी आमिरनं हा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानच्या डोक्यात ‘महाभारत’ विषय घेऊन सिनेमा बनवायचा विचार सुरु होता. पत्रकारांशी बोलताना आमिरने त्याच्या या महत्वाकांक्षी प्रोदेक्टबाबत माहितीही दिली होती. आमिरला महाभारतातील कर्ण’ ही व्यक्तिरेखा प्रचंड आवडते. संपूर्ण ‘महाभारत’ तो कर्णाच्या नजरेतून दाखवण्याचा विचार करीत होता. दीपिका पदुकोणला द्रौपदीच्या रुपात दाखवण्याचा त्याचा मानस होता. बाहुबलीप्रमाणे दोन भागात हा सिनेमा आमिर तयार करू पाहात होता. मात्र हा सिनेमा आकार घेऊ शकला नाही. त्याच दरम्यान काही ओटीटी प्लॅटफॉर्मनी आमिरच्या या प्रोजेक्टमध्ये रुची दाखवली होती. त्यामुळे सिनेमाऐवजी काही भागांची भव्य मालिका तयार करण्याचा निर्णय आमिरने घेतला होता.

दिलेल्या माहितीनुसार सर्व चांगल्या-वाईट परिस्थितीचा अंदाज घेता आमिरनं हा चित्रपट तयार करण्याचा आपला निर्णय बदलला आहे. कोणत्याही कारणशिवाय सद्य परिस्थितीत यावरून वाद होऊ शकतात. याशिवाय ज्या भव्यतेत या चित्रपटाचं शूटिंग केलं जाणार होतं त्यासाठी कमर्शिअली काही त्रुटी असल्यानं आमिरनं तुर्तास या चित्रपटला पूर्णविराम दिला आहे.

सैफ अली अभिनीत ‘तांडव’ या वेबसीरीजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या वेबसीरीजविरोधात जनता आक्रमक झाली होती. मालिकेचे निर्माते, कलाकार आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर खटला दाखल करण्यात आला. निर्मात्यांनी वेबसीरीजमधून विवादास्पद सीन काढून टाकला आणि दिलगिरीही व्यक्त केली. एवढेच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मने या सर्व प्रकरणाबाबत लेखी माफी मागितली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आमिर खाननेतो निर्माण करीत असलेल्या बहुचर्चित ‘महाभारत’ वेबसीरीज डब्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिर खान सध्या त्याच्या नव्या ‘लाल सिंह चड्ढा’च्या निर्मिती आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. या सिनेमानंतर कोणता सिनेमा करायचा याचाही निर्णय त्याने घेतला असून यानंतर तो लगेचच ‘महाभारत’ या त्याच्या महत्वाकांक्षी वेबसीरीजच्या निर्मितीला सुरुवात करणार होता. यासाठी एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत त्याचा करारही झाला होता असे सांगितले जाते. पण आता आमिर खानने महाभारताचा प्रोजेक्ट डब्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचे कारण ‘तांडव’वरून झालेला वाद आहे असे सांगितले जात आहे. महाभारत हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धेचा विषय आहे. ही वेबसीरीज तयार करताना अनावधानाने काही वेडेवाकडे दाखवले गेले तर वेबसीरीजच्या कामावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा विपरीत परिणाम तर होईलच तसेच न्यायालयीन खटल्यांनाही सतत सामोरे जावे लागेल. यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे अधिकारी तयार नसल्याने आमिरने महाभारतावरील वेबसीरीज बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button