BJPMaharashtra Govमुंबईसोशल मीडिया

परिवहन मंत्र्यांनी जो निर्णय घोषित केला तो वरातीमागून घोडं, ही तर चाकरमान्यांची फसवणूक : आशिष शेलार

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रश्नांवर सध्या वादंग पेटले आहे .परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यावरून भाजपाचे नेते आशीष शेलार यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक आहे , अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

“आजपासून एसटीचे बुकिंग सुरु होणार असेल तर मग कसा प्रवास होणार? १० दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय शासनानं घेतला, तरी ग्रामपंचायतीने १४ दिवसांचा निर्णय घेतला त्या विषयी शासनाच्या प्रतिनिधींनी स्थानिकांशी चर्चा केली आहे का? रेल्वे गाड्या सोडण्यास तयार होती मग गाड्या का मागण्यात आल्या नाही? एसटीने जाणार त्या़ंना ई-पास नाही मग खाजगी गाडीसाठी का? शासनाने १० दिवस क्वारंटाइन असं घोषित केले आणि ग्रामपंचायतीने ते मान्य न केल्यास काय करणार? आता एकाचवेळी एसटी आणि खाजगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचे काय? केवळ २५० रुपयात अँटीबॉडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांच्या या मोफत टेस्ट शासनाने का केल्या नाही?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . कोकणातील चाकरमान्यांची कोंडीच शासनाला करायची होती. म्हणून आता वरातीमागून घोड असल्यासारखा निर्णय घेतला आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button