Maharashtra Govमुंबई

खात्याच्या विभाजनावरून अशोक चव्हाण नाराज

 

मुंबई : सार्वजनिक बांधकाम  खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याने पुन्हा एकदा कॉंग्रेस मंत्री अशोक चव्हाण  यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

मात्र तो अशोक चव्हाण यांनाच माहिती नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करून, थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचं असल्याचं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. यासंबंधी आपली तक्रार मांडण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तत्काळ फोनदेखील लावला असे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी त्या त्या खात्यातील मंत्र्यांना गृहीत धरून, परस्पर प्रस्ताव तयार करणे चुकीचे आहे. असे प्रस्ताव सर्वांत आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून मंजूर होणे आवश्यक आहे.

मात्र असे न होता, राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याची अशोक चव्हाणांना काहीही माहिती नव्हती. अधिका-यांनी परस्पर हा प्रस्ताव मांडल्याने चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button