Politicsराजकारण

सरासरी राज्य सरकारने वीज ग्राहकांसोबत बनवाबनवी केली – आशिष शेलार

मुंबई: वीज बिलाच्या मुद्द्यावरुन राज्य शासनास दिलेला शब्द न पाळल्यामुळं आता सर्वसामान्य जनतेसोबकतच विरोधी पक्षानंही सत्ताधाऱ्यांना आरोपांचा विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं.

 ”राज्यातल्या वीज ग्राहकांना कोरोना काळातल्या वीज बिलांमध्ये सवलत देण्यास उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नकार दिल्याने भाजप आक्रमक झाला आहे. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला, अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल!,” असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. 

उच्च व लघुदाब ग्राहकांची वीजबिलांची सुमारे सात हजार कोटींची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे कोरोना काळातील आलेली वाढीव बिलांबाबत सवलत देण्याची शक्यता मावळली आहे. थकबाकीदार ग्राहकांना टप्प्या टप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा राहणार आहे.पण तीन वर्षांपासून थकित असलेल्या ग्राहकांकडून तातडीने वसुली केली जाणार आहे. त्यासाठी विजवितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.   

वीजबिलाची वाढलेल्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात वीजबिलांचा भरणा वेळेत न झाल्याने अनेक ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. त्यावर वीज वितरणने वाढीव दराने बिले ग्राहकांना पाठविल्याने ग्राहकांत असंतोष निर्माण झाला होता. आता सरकारच्या नव्या निर्णयाने पुन्हा असंतोष पसरला आहे. 

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत आणि थेट उर्जामंत्र्यांवर निशाणा साधत भाजपच्या आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. राज्य सरकारच्या काही निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं, “सरासरी” विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली. तशीच बनवाबनवी “सरासरी राज्य सरकारने” वीज ग्राहकांसोबत ही केली. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला..अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल!

नुकतेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घरगुती वीज बिले वसूल केले जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यावर टीका होत आहे. वीज बिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय?  नितीन राऊत यांना जर कोणतेही अधिकार नसतील तर पोकळ घोषणा करू नयेत, या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी, असा सल्ला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button