बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती आज भाजपमध्ये सामील झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी सुपर स्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपात भाजपला हुकमी एक्का मिळाला आहे.

गेल्या महिन्या मिथुन आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना भेटले आणि तेव्हापासूनच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना उधान आले होते. अखेर आज खुद्द मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजप पक्षात प्रवेश करत सर्व चर्चांना पुर्णविराम दिला. मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशामुळे बंगाल विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस होईल यात काही शंका नाही.
#WATCH Actor Mithun Chakraborty joins Bharatiya Janata Party at PM's rally in Kolkata#WestBengalElection2021 pic.twitter.com/MGzGH7sSaf
— ANI (@ANI) March 7, 2021
