Maharashtra Gov

‘सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस असून आज राज्यपालांचे अभिभाषण पार पडले. राज्यपालांनी बरेचसे राजकीय, सामाजिक व आर्थिक मुद्दे मांडले. प्रथम त्यांनी कोरोनाच्या लढ्यात आपले प्राण गमवून बसलेल्या तमाम नागरिकांबाबत संवेदना व्यक्त केली व समस्त कोरोन योद्धांना वंदन केलं. ”माझे शासन कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटलं. ”माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडत आहे,” असे देखील ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा महोत्सव गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे पार पडला नाही तर यंदा तो उत्सव पार पडणार आहे असे राज्यपालांनी नमूद केले.

कोविड-१९ चे नियंत्रण करण्यसाठी शासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून इतर राज्यांसाठी व अनेक देशांसाठी माझे शासन आदर्श ठरले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. संक्रमित रुग्णांची संख्या कमी करून धारावी सारख्या दाटी वाटीच्या वस्त्यांमधील रुग्णांची संख्या कमी करून महाराष्ट्राने सातरोगाचे प्रभावी व्यवस्थापन केले आहे, असे ते म्हणाले. कोरोना नियंत्रणासाठी शासनाला वैद्यकीय व तांत्रिक सहाय्य करण्यासठी टास्क फोर्स देखील स्थापित केले गेले आहेत. राज्यात आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे तर कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील राज्यपालांनी दिली. उपचारासाठी अवास्तव दर स्वीकारला जाऊ नये त्यासाठी महात्मा फुले जीवनदाई योजने द्वारे दर सुनिश्चित करण्यात आले आहे.

तात्पुरत्या स्वरूपासाठी विशाल जुम्बो खाटा उभारण्यात येणार आहेत. या महामारी दरम्यान अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील शासना द्वारे करण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्ट्यावर अतिवृष्टीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्ती सुद्धा यशस्वीरित्या हाताळल्या आहेत. कोरोना विरोधातली लढाई अजून संपली नसून शासना द्वारे ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणात स्पष्ट केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button