FeaturedFinanceMaharashtra GovPoliticsमुंबईराजकारण

आर्थिक पॅकेज देशासाठी, त्यातून मुंबईला कसे वगळणार? – आशिष शेलार

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखाच्या शिवराळ आणि उथळ टीकेचा समाचार घेताना भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राऊतयांचा खोचकपणे ‘पत्रपंडित’ उल्लेख करून त्यांची बेजबाबदार पत्रकारिता म्हणजे “रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला” या लायकीची आहे, अशी टीका केली.

संजय राऊत यांनी केंद्राने मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज दिले पाहिजे अशी मागणी केली आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना ‘देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार?’ अशी विचारणा केली आहे. हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला असा टोमणा मारला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल. तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या? हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला!”.

अजून एक ट्विट करत आशिष शेलार यांनी काही प्रश्न विचारले आहेत. “मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ? मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा,” असे आशिष शेलार यांनी विचारले आहे. मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या, असेही ते म्हणाले आहेत. केंद्र सरकार शक्य ते करुन दाखवत आहेतच…आता तुम्ही काहीतरी करुन दाखवा ना, असा टोमणा त्यांनी मारला.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांचा नामोल्लेख केला नाही. संजय राऊत यांनी देशाच्या आर्थिक राजधानीचे महत्त्व टिकवने महत्त्वाचे आहे. मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणे महत्त्वाचे आहे त्यामुळे पंतप्रधानांनी वेगळं आर्थिक पॅकेज दिले पाहिजे अशी मागणी केली आहे. मुंबईतून २० ते २५ क्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज दिले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button