महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मिनी लॉकडाऊन? वाढत्या कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाचा निर्णय
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला अधिक काळजी घेण्याचे आवाहन केलं असतानाही राज्यात कुठेही त्याचे पालन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून स्थानिक प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. कुठे जमाव बंदी तर कुठे संचार बंदी तर कुठे जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी कोरोना चाचणी अनिवार्य. म्हणूनच की काय महारष्ट्रात मिनी लॉकडाऊनची स्तिथी निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आह. त्यामुळे अनेक जिल्ह्यात आरोग्य प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे. दिल्ली, कर्नाटकनं महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे दिल्लीत जायचे असेल तर महाराष्ट्रातल्या प्रवाश्यांना कोरोना निगेटिव्हचा रेपोर्त दाखवावा लागेल. तर सीमा भागातही स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
विदर्भात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अमरावती, यवतमाळ सह वर्धा जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी चिंता जनक आहे. मराठवाडा सुद्धा अलर्ट झाला आहे. परभणी जिल्ह्यातही कडक निर्बंध लागले गेले आहेत. परभणी जिल्ह्यातून विदर्भात जाणारी आणि येणारी खासगी आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधीकाऱ्यांनी घेतला आहे. तर नांदेड च्या सीमावर्ती भागात आणि विदर्भाच्या सीमेवर अँटिजेन टेस्ट कली जात आहे. विदर्भाच्या सीमेवरती नियम कडक झाले आहेत तर मराठवाड्यात सुद्धा मोठे निर्णय घेतले गेलेत. कोरोना रुग्णात वाढ होत असल्याने विदर्भासह मराठवाड्यातही कडक निर्बंध लागू केलेत.
‘ज्या लोकांना लोकडाऊन हवा आहे ते विना मास्कचे फिरतील. मास्क घाला आणि लोकडाऊन टाळा’, असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे. त्यामुळे जर लोकडाऊन नको असेल तर मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळा व लोकडाऊन टाळा!
