राज्यात कोरोनाचे ३४,००० ॲक्टिव रुग्ण ; रिकवरी रेट ९५ टक्क्यांपर्यंत !
मुंबई: राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही ३५,००० एवढी खाली उतरली असून रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ९५.७४ टक्क्यांपर्यंत आले आहे. राज्यात आज ३५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ५१५ नवीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्युदर कमी होण्याचे आव्हान आजही कायम आहे.
राज्यात आता कोरोना हा आटोक्यात येत आहे. पण तरीही बरे होणारे रुग्ण आणि नवीन रुग्ण यांच्या आकडेवारीत चढउतार दिसून येतोच आहे. सोमवारच्या तुलनेत आज, बुधवारी मृत्यू वाढले असून बरे होणारे रुग्णही वाढले आहेत असे माहितीनुसार कळते. राज्यातील २१ जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण घटत आहे तर १४ जिल्ह्यात ते वाढत असल्याचेही कळते.
राज्यात आतापर्यंत कोरोनाशी होणार्या लढाई मध्ये ५१ हजार ३६० जणांनी आपले प्राण मुकले आहेत. आता राज्यात कोरोना मृत्युदर हा २.५१ टक्के एवढा खाली आला असून रिकवरी रेट हा ९५.७६ टक्के आल्याने दिलासा मिळाला आहे.