वर्सोवातील गॅस सिलेंडरच्या गोदामाला लागली आग !
मुंबई: वर्सोवा येथील ॻॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी जाऊन पोहचल्या आहेत. परिसराचे वातावरण खूप तणावाखाली आहे कारण सिलेंडरच्याच गोदामाला आग लागल्याने आग वाढू शकते याची संभावना आहे.
वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या स्पोटा चे भयंकर आवाज ऐकायला आले. सद्य परिस्थितीत अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. माहितीनुसार , लागलेली आग ही एल – २ लेव्हलची आहे असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे.
या आगी मध्ये आतापर्यंत ४ जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्ण हे ४० टक्के भाजले असून काही जण ६० टक्के भाजले असल्याची शक्यता आहे. हा भीषण स्पोट यारी रोड येथे असणाऱ्या गस सिलेंडरच्या गोदामांमध्ये घडला आहे. परिसरातील स्थानिक रहिवासी, शाळा यातील नागरिकांना व मुलांना सुरक्षित स्थळी हलवल्याचे समजते.

