कोरोनामुळे यंदाची देशातील सर्वात मोठी दहीहंडी रद्द – राम कदम
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे घाटकोपरला होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत असल्याचे भाजपा नेते राम कदम यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता घाटकोपरला होणारी आमची देशातील सर्वातमोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे. असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्ये गोकुळष्टमी म्हणजेच क्रिष्ण जन्माचा उत्सव देशभरात मोठ्य़ा जल्लोषात साजरा केला जातो. दुस-्या दिवशी गोपाळ काल्याला मुंबईसह राज्याच्या अनेक भागात उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली जाते. दहीहंडी म्हणजे जल्लोष, बॅंड पथकं, माणसांची गर्दी आलीच. या बाबी विचारात घेऊन यंदाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय राम कदम यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्वदेखील नेहमीपेक्षा वेगळा असेल असे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता दे असली तरी, यंदाचे सर्व धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम कोरोनाचे संकट लक्षात घेऊन मर्यांदित स्वरूपात साजरे करण्याचा निर्ण सरकारचे धोरण असल्याचे लक्षात येते.

