LokSabha
भाजप खासदार पूनम महाजन यांनी केली नेहरूंवर टीका
‘नेहरूंच्या घोडचुकीची किंमत देश आजही भोगतोय, नेहरूंच्या ऐतिहासिक घोडचुकांची समिक्षा होणे गरजेची आहे. जेव्हा आपण इतिहासात जातो तेव्हा केलेल्या चुकांची समीक्षा होणं गरजेचे आहे. मला नेहरूंबद्दल आदर आहे. मला त्यांच्यावर टीका करायची नाही पण वस्तुस्थिती तर मांडायलाच हवी.
काश्मिरी पंडित असलेले नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते. तर मग काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पळून का जावे लागले.’ असा सवाल करत भाजप खासदार पूनम महाजन यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे. याआधी गृहमंत्री अमित शहा यांनी नेहरुंवर टीका केली होती.