FeaturedLokSabhaMaharashtra GovShivSenaराजकारण

महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील अथवा जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे – शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत केली मागणी

यावर्षी महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या गावांना या परिस्थितीतून पूर्वपदापर्यंत आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सांसद आदर्श गाव योजने अंतर्गत त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील अथवा जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे, जेणेकरुन या गावांचे लवकर पूर्नवसन होऊन सदर गावांतील नागरिकांना इतर सोयी-सुविधां उपलब्ध होतील, यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, ही मागणी केली आहे.

यामुळे सदर पुरग्रस्त गावांतील नागरिकांना विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, दळणवळणासाठी गावा-गावांना जोडणारे रस्ते आदी व्यवस्था पुर्ववत होण्यास विलंब होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button