महाराष्ट्रातील अनके भागात पावसाचे चांगलेच आगमन झाले. तर काही भागात पावसाने हाहाकार मांडला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.मंद्रुपपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप ते टाकळी रस्त्यालगतच्या दरेप्पा म्हेत्रे याच्या शेतात ही घटना घडली. पावसामुळे झाडाखाली अडोशाला खाली थांबलेले तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतूसिंग जीवनसिंग रजपूत (वय ४०), संकेत शिवानंद चौरमोले (वय १७), पार्वती मलप्पा कोरे (वय ४४) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर रविकांत राजकुमार मुळे (वय ९३) व धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे (वय ९२) हे दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close
-
आज कोणतीही घोषणा करणार नाही – मुख्यमंत्रीOctober 19, 2020