तुम्ही पाच वर्षांत चांगलं काम केलं तर यात्रा कशासाठी – अजित पवार
वाशिम दि. २० ऑगस्ट -तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाच हे सरकारचे अपयश आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी वाशिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
जे पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने खुप काही दिलं तरी ते गेले. पुर्वी निष्ठा होती परंतु आता निष्ठेला महत्व राहिलेले नाही. जाणाऱ्यांना भीती, प्रलोभने दाखवली जात आहे. आम्ही १५ वर्ष सत्तेत होतो. विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं ते आज घडतंय असेही अजितदादा पवार म्हणाले.
पाच वर्षांत राज्याला या सरकारने कंगाल करुन टाकले आहे. ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. निव्वळ आश्वासन दिली जात आहेत.
सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली आहे. क्राईम मोठ्याप्रमाणात वाढले आहे. हे सगळं संपवायचं असेल तर आघाडीला निवडून द्या असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.
तुम्ही पाच वर्षांत चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाच हे सरकारचे अपयश आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते @AjitPawarSpeaks यांनी वाशिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.#शिवस्वराज्ययात्रा #NCP2019 @kolhe_amol @dhananjay_munde pic.twitter.com/4c0O86hSEW
— NCP (@NCPspeaks) August 20, 2019
सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे त्यामुळे आम्ही विरोधक आहोत. आमच्यावर ते टिकाच करणारच, कौतुक थोडे करणार आहे असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा पवार यांनी सांगितले.
भाजप पक्षाने नवीनच पद्धत अवलंबली आहे. ते निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचा अंदाज बघतात आणि त्यांना गोळा करत आहेत. हे लोकशाहीला मारक आहे लोकशाहीचा गळा घोटणारे आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार राहुल पोटे आदी उपस्थित होते.
