“महाराष्ट्र किती मोठा आहे ठाऊक आहे का?”, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात होती. तशी याचिका सर्वोच्च न्यायालयात देण्यासाठी आली होती. ती याचिका आज (१६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांला चांगलेच फटकारले. तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असे विचारत सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिका कर्त्यांना सुनावले आहे. दिल्लीतील ३ जणांनी ही याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. दिल्लीतील तीन रहिवाशांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महा विकास आघाडी सरकारला बरखास्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली.
रिषभ जैन, गौतम शर्मा आणि समाजसेवक विक्रम गहलोत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारला बरखास्त करावे, अशी मागणी केली होती. “तुम्ही राष्ट्रपतींना विचारा,” असे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सांगितले आहे. “महाराष्ट्र किती मोठा आहे हे आपणास ठाऊक आहे,” अशी याचिका फेटाळून लावताना मुख्य न्यायाधीशांनी म्हटले आहे.