उच्च न्यायालयमनोरंजन
अभिजित बिचुकलेंचा बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा
अभिजित बिचुकले यांच्यावर झालेली खंडणीची तक्रार खुद्द तक्रारदारानेच आता मागे घेतली असुन बिचुकलेंचा बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिचुकले विरोधात फिरोज पठाण यांनी खंडणीची तक्रार दाखल केली होती आणि या प्रकरणात बिचुकलेंला न्यायालयीन कोठडीदेखील सुनावण्यात आली. परंतु, खुद्द फिरोज पठाण यांनी तक्रार मागे घेत असल्याचे पत्र न्यायालयात लिहून दिले. ‘अभिजीत बिचुकले ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरात खेळत आहे ते पाहाता तो नक्कीच जिंकेल. अभिजित बिचुकलेमुळे साताऱ्याचे नाव उंचावले आहे’ असं पठाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. त्यामुळे बिचुकले आता लवकरच पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

