शिवसेनेची टीका अर्थ, तत्त्व आणि मूल्यहीन – फडणवीस
मुंबई : शिवसेना केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेला अर्थ नाही, तत्त्व नाही आणि मूल्यही नाही, असे टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियावर पत्रकार परिषद घेतली. केंद्राने घाईने लॉकडाउन केला अशी टीका आता होते आहे, या विधानावर फडणवीस यांनी उल्लेखित उत्तर दिले.
शिवसेनाला तपमाना मारताना फडणवीस म्हणालेत की, आमच्यासोबत शिवसेना पाच वर्षे सत्तेत होती तेव्हाही त्यांनी विरोधी पक्षाचेच काम केले. एका भूमिकेवर ते ठाम राहिले तर ठीक होते. पण रोज भूमिका बदलयाची हे त्यांचं धोरण! एक दिवस म्हणायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत, असे म्हणायचे. मग काही दिवसांनी मोदींवर टीका करायची. एकदा राज्यपालांना नाव ठेवायची, नंतर कुनिर्सात करायचा. फक्त टीकेसाठी टीका करायची असे शिवसेनेचे धोरण आहे; त्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नाही.
आज राज्यात करोनाची स्थिती वाईट होत चालली आहे. मात्र जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात तेवढ्या होत नाहीत. देशाच्या आधी लॉकडाउन पुकारला तो महाराष्ट्राने. मग लॉकडाउनची घाई कुणी केली? देश आम्हाला ‘फॉलो’ करतो आहे अशा जाहिराती तेव्हा केल्या! आता यांना त्याचा विसर पडला त्यामुळे केंद्राने लॉकडाउन करताना घाई केली अशी ओरड सुरू केली, असे फडणवीस म्हणालेत.
कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड ताब्यात घेतले आहेत वगैरे याही पोकळ घोषणा आहेत. श्रमिक जेव्हा ट्रेन सुरू झाल्या नव्हत्या, श्रमिक पायी चालले होते तेव्हा आपल्या डोक्यावरचे संकट टळले हे या सरकारचे धोरण होते. श्रमिकांची काळजी त्यावेळी घेतली गेली नाही. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत मी त्यांना सल्ला दिला होता की पायी जाणाऱ्या श्रमिकांना थांबवा, असा दावा फडणवीस यांनी केला.
तीन पक्षांच्या सरकारला ‘पॉलिसी पॅरेलेसिस’ झाला आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस म्हणालेत – “तीन पक्षांच्या सरकारमध्ये काहीही ताळमेळ नाही. तीन पक्षांचा एकमेकांशी समन्वय नाही. तसेच या तीन पक्षांचा अधिकाऱ्यांशीही समन्वय नाही त्यामुळे ठाकरे सरकारला पॉलिसी पॅरेलेसिस सोबत अॅक्शन पॅरेलेसिसही झाला आहे.”


