Travel
मध्यरात्रीपासून राज्यातील रिक्षावाले संपावर
आज मध्यरात्रीपासून मुंबई, ठाणे आणि राज्यातील रिक्षावाले संपावर जाणार आहेत. रिक्षाचालकांना भाडेवाढ मिळावी, रिक्षाचालक-मालक यांच्यासाठी असलेले कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याच्या अंतर्गत असावे, ओला – उबरसारख्या टॅक्सी सेवा बंद करण्यात याव्या अशा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या. पण त्यामध्ये देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत कोणतीही पावलं उचलली गेली नसल्याने रिक्षाचालकांनी संपाचा मार्ग निवडला.
