राजकारण

ईव्हीएममुळे ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ – राज ठाकरे

ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचं सांगतानाच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगावर टीका केली.

या संवादात राज ठाकरे यांनी भाजपवर देखील टीका केली. गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएमवर लोक संशय घेत आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास त्यात स्पष्टता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल, असं सांगतानाच ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झालाय. या मतदारसंघात जास्तीचं मतदान मोजलं गेलंय. याकडेही निवडणूक आयोगाचं लक्ष वेधल्याचं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button