FoodMaharashtra Govपुणेमुंबई

विभागात ३५ हजार ८४९ क्विंटल अन्नधान्य, ८ हजार ४६१ क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 1 हजार 845 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 17 हजार 696 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 7 मे 2020 रोजी  101.800 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.215 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 28 हजार 658 स्थलांतरित मजुरांची सोय1 लाख 458 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 148 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 167 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 383 रिलिफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 28 हजार 658 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  458 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button