कोरोना योद्धांची भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी घेतली भेट
मुंबई : कोरोना साथीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजविला असताना, मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. मात्र अश्या संकटसमयी आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी दिवसरात्र एक करून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. अश्या या कोरोना योद्धांची आज भाजपचे नेते आणि आमदार डॉ. आशिष शेलार यांनी परेलच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
जीव धोक्यात घालून केईएम मध्ये काम करणाऱ्या "कोरोना वॉरियर्सची" आज भेट घेऊन विचारपूस केली. विशेष म्हणजे चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय असून त्यांचे कौतुक केले. तर डाँक्टरांकडून रुग्ण सेवेचा आढावा घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.सोबत माजी आमदार मधू चव्हाण होते! pic.twitter.com/0yQe0eMr8q
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 8, 2020
परेलच्या रुग्णालयात जाऊन शेलार यांनी सर्वच कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. विशेष म्हणजे या लढ्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच रुग्णालयातील प्रत्येक विभागाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.


