कोरोना अपडेट : मुंबईमध्ये ४६१ नवे रुग्ण !
मुंबई: एकीकडे राज्य शासन हे दुसरा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे मुंबईतील बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांची येण्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि प्रतिबंधात्मक नियम धुडकावून शहरात ठिकठिकाणी होणारी गर्दी यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोना व्हायरस प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ला लॉकडाऊन करण्याच्या उपायांवर विचार करण्यास भाग पाडले आहे. बुधवारी सामना वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक व गंभीर असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सर्व जिल्हाधिकारी, राज्य कोविड -१९ टास्क फोर्स, मनपा आयुक्त, पोलिस आणि वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मंगळवारी परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेतले.
मुंबईत दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ४०० होती. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या पुन्हा पाचशेपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ापेक्षा या आठवडय़ात निश्चितच रुग्णांची संख्या चारशे ते पाचशेने वाढली आहे. मंगळवारी ४६१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३,१५,०३० झाली आहे.
चेंबूरचा भाग असलेल्या एम पश्चिममध्ये आणि मुलुंडचा भाग असलेल्या टी विभागात रुग्णवाढीचा दर ०.२६ टक्के झाला आहे. चेंबूरमध्ये सरासरी २० रुग्ण आढळत असून मुलुंडमध्ये दररोज सरासरी ४० रुग्ण आढळत आहेत.