मुंबई |बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून सडकून टीका होत आहे .
बिहारमध्ये एनडीएचीच सत्ता प्रस्थापीत झाली.बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागांवर विजय मिळवला. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. बिहार निवडणुकांमधील विजयानंतर भाजपामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच अनेकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील कौतुक केले आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , काँगसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला…आता…महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन!, असे ट्वीट शेलार यांनी केले .
तसेच भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या “जगंलराज का युवराज”ला बिहारच्या जनतेने नाकरले. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत “जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज” युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असेही शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले .
दरम्यान भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती.
काँगसने महाराष्ट्रात "हातात" "धनुष्यबाण" धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला…
आता…
महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या "घड्याळाचे"
काय सांगावे टायमिंग…?पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच!
त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन! pic.twitter.com/e0kK3EqfPg— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 11, 2020
भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या "जगंलराज का युवराज" ला बिहारच्या जनतेने नाकरले..
महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत "जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज" युती करुन बसलेत.
समजनेवाले को इशारा काफी हैमा.पंतप्रधान नरेंद्र मोदी,
नितीश कुमारजी
आणि देवेंद्रजींचे
अभिनंदन!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 11, 2020
