Monsoon
पुढील ५ दिवस राज्यात कोरड
मराठवाडा, विदर्भ, खान्देशात पहिलेच कोरड पडलेली असताना १७ जुलैपर्यंत म्हणजे पाच दिवस पाऊस हुलकावणीच देईल, असा इशारा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. मुंबई, नाशिक, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात दमदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात आजवर ३० टक्क्यांच्या आसपास पाऊस होण्याची अपेक्षा असताना फक्त १५.७ टक्के पाऊस झाला.
‘राज्यात १७ जुलैपर्यंत मान्सूनचा खंड पडेल. त्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय होईल. दर मोसमात मान्सूनचा अक्ष एक-दोनदा बदलत असतो. ही सामान्य बाब आहे.’ अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.