Maharashtra Gov

महाराष्ट्रात फडणवीस काढणार रथयात्रा

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी रथयात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झालेली आपणास पाहायला मिळेल. या निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असून ‘फिर एक बार, शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार, २२० के पार’ अशी घोषवाक्यं घेऊन मुख्यमंत्री आपली रथयात्रा काढणार आहेत. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात रथयात्रा जाईल व ही रथयात्रा ऑक्टोबरमध्ये काढण्यात येईल, असे नमूद करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याचा आमचा संकल्प असून राज्यात पुन्हा एकदा शिवशाही सरकार आणायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button