Maharashtra Govमुंबई

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेमधील प्रमुख मुद्दे

प्रधानमंत्री गरिब कल्याण याजनेत अन्नधान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या तीन महिन्यांत केंद्र सरकारने अन्नधान्य महाराष्ट्राला दिले.

गहू : 1750 कोटी रूपये
तांदूळ : 2620 कोटी रूपये
डाळ : 100 कोटी रूपये
स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटी रूपये*
असे एकूण
एकूण : 4592 कोटी रूपये

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत 1726 कोटी रूपये, जनधन योजनेच्या माध्यमातून 1958 कोटी रूपये, विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रूपये असे एकूण 3800 कोटी रूपये केंद्र सरकारने दिले

उज्वला गॅस योजनेत 73 लाख 16 हजार सिलेंडरसाठी 1625 कोटी रूपये 600 रेल्वेगाड्यांसाठी 300 कोटी रूपये

बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण 1001 कोटी रूपये

एसडीआरएफमध्ये 1611 कोटी रूपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रूपये असे एकूण 2059 कोटी रूपये दिले

डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5648 कोटी रूपये देण्यात आले

शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी
कापूस : 5647 कोटी रूपये
धान : 2311 कोटी रूपये
तूर : 593 कोटी रूपये
चणा/मका : 125 कोटी रूपये
तसेच पीकविम्यासाठी 403 कोटी रूपये असे एकूण 9079 कोटी रूपये

हा संपूर्ण खर्च पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला या काळात 28,104 कोटी रूपये दिलेले आहेत

महाराष्ट्राला आरोग्यासाठी मिळालेली मदत
महाराष्ट्राला हायड्रोक्सिक्लोरोक्विन: 47 लाख 20 हजार
प्रयोगशाळांना मान्यता : शासकीय 41/खाजगी 31
पीपीई किटस : 9.88 लाख
एन 95 मास्क : 15.59 लाख
आरोग्यासाठी मदत : 468 कोटी

केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये एमएसएमई/गृहनिर्माण/डिस्कॉम/नरेगा/आरआयडीएफ/कॅम्पा एम्पॉयमेंट/स्ट्रीट वेंडर्स/फार्मगेट इन्फ्रा, मायक्रो फूड एन्टरप्राईजेस, पशुसंवर्धन इत्यादींतून किमान 78,500 कोटी रूपये महाराष्ट्राला मिळतील

जे मिळाले ते 28 हजार कोटी रूपये, केंद्राच्या निर्णयांमुळे महाराष्ट्राला जो निधी उभारता येऊ शकतो, तो 1,65,000 कोटी रूपये आणि केंद्राच्या पॅकेजमधील 78 हजार कोटी रूपये असे एकूण 2,71,500 कोटी रूपयांचा लाभ होऊ शकतो. आता गरज धाडसी निर्णयांची

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती अतिशय वाईट. रूग्णसंख्या/मृत्यू यात मोठी वाढ. आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी करण्यात आली आहे. काल केवळ 2900 चाचण्या केल्या आहेत. आता एकूण चाचण्यांपैकी 32 टक्के रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत

राहुल गांधीजी यांचे आजचे विधान तर अतिशय गंभीर आहे. स्वत:च्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत

राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर या सरकारची प्राथमिकता काय आहे, हे सहज लक्षात येईल

सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत
– देवेंद्र फडणवीस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button