FinanceMaharashtra GovPoliticsमुंबई

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वेभाड्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख

रेल्वेभाड्यापोटी दिली एकूण ६७ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम

 मुंबई :   स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती, त्यानंतर त्यांच्या रेल्वे भाड्याचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल असे म्हटले होते व पहिल्या टप्प्यात राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ०७० रुपये जमा केले होते. आता सहा जिल्ह्यांना अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख ०८ हजार ४२० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. म्हणजेच स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत. हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

ज्या सहा जिल्ह्यांना वाढीव निधी देण्यात आला आहे ते जिल्हे असे:- मुंबई उपनगर जिल्हा- १० कोटी, अहमदनगर- ३० लाख, सातारा- ४९ लाख ६८ हजार ४२०, सांगली- ४४ लाख ४० हजार, सोलापूर- २० लाख, कोल्हापूर- १ कोटी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button