FeaturedMaharashtra Govमुंबई

मुंबई कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे समाधान वाटले

मुंबई : मुंबईतील करोनाने हाहाकार माजवला असून, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दिवसाला एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आढळून येत असताना मंगळवारी काहीसा दिलासा देणारी बातमी पुढे आली. मुंबईत ८०६ करोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आले. मात्र, यावर विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतके कमी रुग्ण आढळून येण्यामागील कारण समोर आणत फडणवीस यांनी प्रशासनावर नंबर ठीक ठेवण्याचा आरोप केला आहे. केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल, तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

महापालिका प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी कमी रुग्ण आढळून येण्यामागील कारण आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आता आयसीएमआरनं लक्षणं असलेले आणि नसलेले अशा दोघांच्याही चाचण्या मोठ्या प्रमाणात घेण्याच्या सूचना केली आहे. त्याचबरोबर चाचण्यांचे अहवाल २४ तासात कसे येतील, हे याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. लक्षणं असलेल्या रूग्णांच्या बाबतीत उशिराने आलेला अहवाल हा धोकादायक ठरू शकतो. खाजगी रूग्णालयांकडूनही मोठ्या प्रमाणात रूग्णांची लूट होत आहे. याकडेही राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

नाशिकची स्थिती सध्या क्रिटीकल टप्प्यात आली आहे. त्यामुळे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, प्रशासन काम करते आहे. पण, ते काम प्रत्यक्ष जमिनीवर पण दिसले पाहिजे. काल मुंबईत थोडे कमी म्हणजे ८०६ रूग्ण आढळून आले, तर मला समाधान वाटले. पण नंतर कळले की मुंबईत काल केवळ ३३०० चाचण्या झाल्या आहेत. अशापद्धतीने केवळ नंबर ठीक ठेवण्यासाठी यंत्रणा काम करीत असेल, तर त्यांना मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button