मुंबई: कोरोनाने राज्याच्या प्रत्येक शहरात, खेड्यात हातपाय पसरले आहेत. कोरोनावरची लस कधी येणार हेदेखील अद्याप निश्चित नाही. आमि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ टाळेबंदी लावून उपयोग नाही हे लक्षात आल्यानंतर आता राज्य सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवली आहे.
"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेची पहिल्या आठवड्यातील अंमलबजावणी!
या मोहिमेमध्ये गृहभेटींद्वारे संशयित कोरोना रुग्ण शोधणे, कोमॉर्बीड रुग्णांची नोंद करणे,उपचार करणे,आरोग्य शिक्षण व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेला महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे यासाठी सर्वेक्षण केले जाते. pic.twitter.com/G5WcCE4s0W
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 24, 2020
या मोहिमेत ५५ हजार २६८ पथकं स्थापन करण्यात आली आहेत. तर आत्तापर्यंत ६९.९४ लाख घरांना भेट देऊन झाली असून आत्तापर्यंत २ कोटी २४ लाख व्यक्तींची तपासणी झाली आहे. ३७ हजार ७३३ कोविड संशयित व्यक्तींची तपासणीही झाली आहे. त्यापैकी ४ हजार ५१७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे.

