वसई- विरार मध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली !
मुंबई: वसई-विरार शहरातील करोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मागील दोन दिवसांत शहरामध्ये करोनाचे ६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात नव्याने निर्बंध लागू करता येतील का याबाबत पालिकेचा विचार सुरू आहे.
वसई-विरार शहरात मागील दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. डिसेंबर २०२० मध्ये शहरात करोनाचे १ हजार ८१ रुग्ण आढळले होते तर २४ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात करोना रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी घसरली होती. जानेवारी २०२१ मध्ये करोनाचे केवळ ५८२ रुग्ण आढळले होते तर केवळ ९ जणांचा मृत्यू झाला होता.
ही दिलासा देणारी बाब असल्याने पालिका प्रशासन निश्चिंत होते. त्यानंतर शहरातील करोना उपचार केंद्रेदेखील बंद करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. मागील दोन दिवसांत तर करोनाचे ६० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी कोविड -१९ साठी चाचणी घेतलेल्या आणि चाचणी सकारात्मक आलेल्या नवीन रुग्णांची सक्रीय रूग्णांची संख्या 40, 858 एवढी वाढली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा दर हा 95.5% आहे.
एकूण 4,34,343 रुग्ण बरे झाले आहेत आणि रूग्णांची एकूण संख्या रूग्णालयातून 19,87, 804 अशी आहे. बुधवारी राज्यात नवीन कोविड -१९ च्या केसेस नोंदवल्या गेल्या असून दोन महिन्यांपेक्षा जास्त काळातील ही एक दिवसाची सर्वाधिक मोजणी आहे.करोना रुग्णांची संख्या कशी आटोक्यात येईल याबाबत विचार सुरू आहे. वसई-विरारप्रमाणे मुंबई आणि राज्याच्या इतर भागांतदेखील करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यााबबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांच्याशी चर्चा केली.


