FeaturedMaharashtra Govयवतमाळ

यवतमाळ मार्गावर मजुरांच्या बसला भीषण अपघात; चार ठार

अजून किती बळी जाणार?

यवतमाळ : स्थलांतरित मजुरांचे अजून किती बळी जाणार आहेत? मजुरांच्या अपघातांचे सत्र थांबत नाही. हे भीषण आहे. कधी नव्हे ते एवढ्या संख्येने स्थलांतरित त्यांच्या मूळ गावी निघाले आहेत. मात्र, कोरोनाच्या आधी त्यांना अपघात, भुकेनेच प्राण गमवावा लागत आहे.

औरंगाबाद रेल्वे अपघात, ठाणे-नाशिक महामार्गावरचा टेम्पो अपघात अशा एक ना अनेक घटना रोज घडत आहेत. तर आता पुन्हा यवतमाळ मार्गावर भीषण अपघातात दोघांचा जागीच प्राण गेला. सोलापूरहून कामगारांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या एसटी बसची टिप्परला धडक बसून यवतमाळमध्ये भीषण अपघात झाला.  यामध्ये बसमधील चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णीजवळील कोळवण गावानजीक हा अपघात झाला. सोलापूरहून निघालेले मजूर एसटी बसने झारखंड राज्यात जात होते.

बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २२ जण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 देशभरात लॉकडाऊन जारी असल्याने प्रवासी मजुरांची बरीच कुचंबणा होत आहे. त्यामुळे हे मजूर आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी मिळेल त्या वाहनाने ते आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या दरम्यान, होणाऱ्या अपघातात अनेक मजुरांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मजुरांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या या एसटी बसला मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ज्यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास यवतमाळ येथील कोळवन गावाजवळ हा अपघात झाला. 

या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण  जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button