LokSabha

‘बोरवेलसाठी केंद्र सरकार कायदा करणार का?’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जलशक्ती मंत्र्यांना सवाल

देशात पर्जन्यमानामुळे दरवर्षी साधारणपणे ४००० कोटी घनमीटर पाणीसाठा जमा झालेला बाष्पीकरण, भौगोलिक आणि इतर काही समस्यांमुळे सुमारे ११२३ कोटी घनमीटर जलसाठा उरतो. २००१ मधील आकडेवारीनुसार हे प्रमाण १८२० घनमीटर एवढे असून भविष्यात हेच प्रमाण २०२५ पर्यंत वार्षिक १३४१ घनमीटर होण्याची शक्यता असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

वार्षिक दरडोई १७०० घनमीटर पाणीसाठा असणे हे याबाबतीत सावध इशारा असून १००० घनमीटर पाण्याची साठवण हे पाण्याच्या दुर्भिक्ष असल्याचे निर्देशित करते. भारत देश हा अमेरिका आणि चीन नंतर सर्वात जास्त भूजलाचा वापर करणारा देश आहे. देशात भूजलाचा वापर शेती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. २००२ ते २००८ पर्यंत देशात १०९ घनमीटर पेक्षा जास्त भूजलाचा वापर केला गेल्याचे दिसून येत आहे. नीती आयोगाने पुढील वर्षापर्यंत देशातील दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरु या शहरांबरोबर एकून २१ शहरांना DAY ZERO संकट वर्तविले आहे. देशात भूगर्भातून पाणी उपसा करण्याचे अवैध प्रकार घडत असताना ही भूजल पातळी कश्याप्रकारे वाढवू शकतो, हा विचार आपण सर्वांनी मिळून करणे अतिशय महत्वाचे असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गंभीरतेने सांगितले.

देशात अनेक ठिकाणच्या बोअर वेल या कोरड्या पडल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात बोअर वेलसाठी २०० फुट खोदणे अवैध आहे. जेवढे जास्त खोल खोदल्यावर जास्त पाणीसाठा लागू शकतो या गैरसमजामुळे तसेच राज्यांमध्ये बोअर वेल खोदण्याच्या मर्यादेसाठी समान कायदा नसल्यामुळे बोअर वेल खोदण्यासाठी भूगर्भात खोलवर खोदणे अवैधरित्या चालू असून हे अयोग्य असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकार असे अवैध प्रकार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा करणार आहे का? असा प्रश्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विचारत बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून सदर बोअरवेलमध्ये पावसाचे पाणीसाठा साठवण्याची अट घातली पाहिजे, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली.

यावर केंद्र सरकार अशा प्रकारचा समान कायदा काढू शकत नसल्याचे स्पष्ट करत काही राज्यांनी बोअरवेल खोदण्याच्या मर्यादा ठरवण्यासंदर्भात पाऊले उचलली असल्याचे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button