वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीजी यांनी पाहिलेले स्वप्न साकारत जम्मू – काश्मीर बाबतचे ३७० आणि ३५ (अ) कलम हटविण्याच्या निर्णय घेत जम्मू – काश्मीर भारतात सामील करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल केंद्र सरकार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करित ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर शिवसेनेच्या वतीन जल्लोष साजरा करण्यात आला.



