Environmentसांगली-मिरज-कुपवाड (Sangli, Miraj & Kupwad)
कृष्णा नदीच्या पात्रात साखर कारखान्यातील मळी, नदीच्या किनाऱ्यावर मेलेल्या माश्यांचे खच
कृष्णा नदीच्या पात्रावर असलेल्या साखर कारखानदारांनी कारखान्यातील मळी कृष्णा नदी पात्रात सोडल्याने नदीतील हजारो मासे मरून पडले आहे. उन्हाळ्याच्या काळात कृष्णा नदीची पातळी खालावलेली होती. मात्र गेल्या ८ – ९दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात वाढ झाली. याचाच फायदा साखर कारखानदार घेत असून कारखान्यातील मळी नदी पात्रात मिश्रीत करत आहेत आणि त्याचा परिणाम नदीतील जलजीवनावर होत आहे.
नदी पात्रातील पाणी रासायनिक झाल्यामुळे नदीच्या किनाऱ्यावर मेलेल्या माश्यांचे खच पडले असून त्याचा दुर्गंध जवळील परिसरात पसरत आहे. रासायनिक पाण्यामुळे नदीतील पाणी पिण्या योग्य नसल्याने नदी काठच्या गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.