कोरोना काळात शेतकऱ्यांना भरावी लागणार वीजबिले उप मुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
औरंगाबाद: शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असल्याने कर्जमाफी दिली होती. मात्र, महावितरण कंपनी टिकवायची असेल तर या पुढे वीज देयक भरावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यात कृषिपंपाची ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून मराठवाड्यात ती १५ कोटी रुपये एवढी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी थकबाकीतील दंड आणि दंडव्याज यात सवलत दिली आहे.
त्यापोटी पाच हजार कोटी रुपयांची मदत झाली आहे. पण यापुढे जेवढी रक्कम भरली जाईल तेवढी रक्कम त्याच जिल्ह्यातील महावितरणच्या पायाभूत विकासावर खर्च केले जातील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सोमवारी झालेल्या बैठकीत महावितरण कंपनीचा कारभार लॉकडाऊन नंतर सुरळीत होण्यासाठी अजित पवार यांनी वेगवेगळ्या उपाययोजनांवर चर्चा केली. त्यांनी अश्या सूचना दिल्या की वसुली आणि त्यावर होणार पायाभूत विकास यावर विभागीय आयुक्तांनी देखरेख ठेवावी. कोरोनाकाळात वीज पुरवठ्यावर कुठल्याही प्रकारची कपात केली नाही असेही त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे आगामी वीजबिले ही भारावीच लागतील असे अजित पवारांनी सांगितले. आठ जिल्ह्यांतील तरतुदींची रक्कम वाढवून देण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले. वीज कपात आणि थकबाकीवर राज्यभरात अनेक आंदोलने चालू आहेत त्यामुळे वित्त मंत्री कोणते आदेश देतात यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.