Health & FitnessHealth & FitnessMaharashtra Gov

मौसमी आजार समजून सर्दी खोकला अंगावर काढू नका !

मुंबई: मुंबईमध्ये फक्त कोरोनाच नव्हेच तर मौसमी आजार जसे की सर्दी खोकल पण वाढत आहे. पण कोरोनामुळे बरीच खबरदारी लोक हे आता घ्यायला लागले आहेत . मागील दोन आठवड्यापासून सर्दी व खोकल्याचा त्रास मुंबईकरांमध्ये वाढताना दिसत आहे. पूर्वीप्रमाणे हा त्रास अंगावर न काढता लक्षणे दिसताच वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

संसर्गाचा फैलाव झाल्यानंतर सर्वसामान्यांनी जीवनशैलीमध्ये बदल केला. पोषक आहार, व्यायामावर भर दिल्यामुळे एरव्ही जे आजार होतात, त्यांचे प्रमाण कमी झाले होते. मास्क लावल्यामुळे सर्दी, खोकला वा इतर ऋतूबदलामुळे होणाऱ्या आजारांचा त्रासही नियंत्रणात होता. मात्र सध्या सर्दी, खोकल्यांचा त्रास वाढला आहे.

नाकातून पाणी येणे, सतत शिंका येणे, खोकल्याची उबळ येणे, खोकला येत असताना मूत्रविसर्जनावरील नियंत्रण निघून जाणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी भेडसावत आहे. खोकला वा सर्दी ही ऋतूबदलामुळे असेल तरीही हा त्रास अंगावर काढू नका असे अनेक डॉक्टर्स सल्ला देत आहे. माहितीनुसार कळते की, सर्दी, खोकला अशाप्रकारचे आजार घेऊन येणाऱ्या लोकांचे प्रमाण हे १० टक्के एवढे असते.

तीन दिवसांपेक्षा अधिक काळ हा त्रास कमी झाला नाही तर अशा रुग्णांना करोनाच्या चाचण्या करून घेण्यासाठी सांगितले जाते. मात्र या रुग्णांमधील निम्मे रुग्ण पुन्हा वैद्यकीय उपचारांसाठी येत नाही, असेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. त्यामुळे या आजारांकडे दुर्लक्ष करू नका असे डॉक्टर्स सांगतात.

करोना संसर्गाची सुरुवात झाली होती तेव्हा या आजाराला दूर ठेवण्यासाठी काढे घेण्याकडे सर्वसामान्यांचा कल होता. मात्र त्यातून उष्णतेचा त्रास होऊन सतत शौचास होणे, पोटात मुरडा येणे, तोंडामध्ये फोड येणे तसेच त्वचेवर अॅलर्जीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या काढ्यांचा अतिरेक करू नका, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button