मनोरंजनमुंबई

मध्यमवर्गीयांच्या गोष्टी चित्रपटातून दाखवणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

मुंबई : ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मे’, ‘एक रुका हुआ फैसला’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचं मुंबईत निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते.

दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. “दिग्दर्शक बासू चटर्जी यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. दुपारी सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. इंडस्ट्रीचे सर्वांत मोठं नुकसान आहे. ”तुमची खूप आठवण येईल,”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘हलकेफुलके विनोद आणि साधेपणा या चित्रपटांतील दोन वैशिष्ट्यांमुळे ते कायम लक्षात राहतील’, असं त्यांनी म्हटले आहे.

बासू चटर्जी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी अजमेरमध्ये झाला. ‘चमेली की शादी’, ‘खट्टा मीठा’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबाची खुसखुशीत, हलकी फुलकी आणि मनाला भावणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडली. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सात फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. १९९२ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘ब्योमकेश बक्षी’ आणि ‘रजनी’ यांसारख्या मालिकांचंही दिग्दर्शन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button