‘पुन्हा सुरूवात'(मिशन बिगिन अगेन)मध्ये आणखी काही व्यवहार खुले
मुंबई : ‘पुन्हा सुरूवात’ (मिशन बिगिन अगेन) अंतर्गत काही व्यवहारांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतची माहिती एका परिपत्रकातून देण्यात आली आहे. खुल्या मैदानातील- बगीचातील साधने, खुल्या जीम, बार (स्विंग) व्यायामासाठी वापरता येतील.
रास्ता, गल्ली-बोळातील एका बाजूची दुकाने आलटून-पालटून एक दिवसाआड उघडी राहतील. हे सर्व व्यवहार व या भागातील वाहतूक भौतिक अंतर पाळून होतील यासाठी मनपा व पोलीस आयुक्त, दुकानदार संघटना यांनी संयुक्तपणे प्रयास करावेत.
सर्व खाजगी कार्यालये ८ जूनपासून १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यातील जी संख्या जास्त असेल) संख्यने सुरू करता येतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरणाच्या निकषांचे काटेकोर पालन करावे.
७ जूनपासून वर्तमान पत्रांची छपाई आणि वितरण करता येईल. यात संबंधितांनी मास्कचा वापर करणे, भौतिक अंतर याचे पालन करावे.
शैक्षणिक संस्था (विद्यापीठ, कॉलेज, शाळा) यांनी फक्त शिक्षण व्यतिरिक्त कामे – इ कन्टेंटत ची माहिती भरणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि परीक्षांचे निकाल घोषित करणे करावीत, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केले आहेत.




