मुंबई: राज्यातील राजकारणात सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात रणकंदन पाहायला मिळत आहे. ‘राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र मध्यावधी निवडणूक कुठल्याही पक्षाला नको आहे. आम्हाला पण मध्यावधी नको. पण हे सरकार टिकणार नाही,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यानंतर राज्यात मोठा भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे.‘भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी अशीही परिस्थिती नाही. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार,’ अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी मध्यावधी निवडणूक होण्याची भविष्यवाणी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात राज्यात मध्यावधी निवडणुका व्हाव्या अशी कुठल्याही पक्षाची इच्छा नाही. एक निवडणूक लढणं, पक्षाला आणि उमेदवाराही अवघड असतं, अनिश्चितता राहते, शेवटी कोणाची तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढवेल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे. शिवसेना आमच्यासोबत आली नाही तर राष्ट्रवादीने भाजप-रिपाइंसोबत यावं. रिपाइं आधीही राष्ट्रवादीसोबत होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आणि रिपाइं असं सरकार महाराष्ट्रात बनवू शकतो. पवारांना भविष्यात सत्तेत संधी मिळू शकते. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेते एनडीएमध्ये आले तर नरेंद्र मोदींना त्यांची साथ मिळेल आणि देशाच्या विकासासाठी फायदा होईल, असा नवा फार्मुला आठवले यांनी राष्ट्रवादीसमोर ठेवला आहे
‘भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी अशीही परिस्थिती नाही. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार,’ अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी मध्यावधी निवडणूक होण्याची भविष्यवाणी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
