Maharashtra Govसोलापूर

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही !

सोलापूर: केंद्र सरकारने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही़ केंद्र व राज्य असा दुजाभाव विरोधी पक्षांनी करू नये, कारण एकेकाळी तेही सत्तेवर होते़ राज्य सरकार जे जे शक्य आहे ते करणारच आहे, आपत्तीग्रस्तांना वाºयावर सोडणार नाही असे मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यकत केले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आज सोलापूर दौºयावर आहेत. मुख्यमंत्री हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करून शेतकºयांची संवाद साधला़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शेतकºयांची निवेदने स्वीकारली.

दरम्यान, विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘राज्य सरकारला केंद्राकडे मदत मागावी लागतेय, कारण जर केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही. मला यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण आणायचं नाही.’ पुढे बोलताना त्यांनी नुकसानग्रस्त भागातील गावकऱ्यांना आश्वासन दिलं आहे ते म्हणाले की, ‘तुम्हाला कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही. हे तुमचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्व जनतेचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही.’

‘झालेल्या नुकसानाबाबत जी काही मदत करायची आहे. ती मदत करण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. सगळीकडे पंचनामे सुरु आहेत. सगळी माहिती घेतली जात आहे. तसचे ही माहिती आम्ही केवळ घेत बसणार नाही तसेच या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. जशी माहिती आमच्याकडे येईल तशी आम्ही मदतीला सुरुवातही करणार आहोत.’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळीराजाला आश्वासन दिले आहे. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधितून ४ लाखांची मदत जाहीर केल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आताही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे़ सुदैवाने आज उघडीप आहे़ सर्व जनतेला दिलासा देतो आहोत, प्राणहानी होता कामा नये ही आमची भावना आहे़ पाऊस पुन्हा येऊ नये अश्ी माझी प्रार्थना आहे़ मात्र जी परिस्थिती उध्दभवली आहे ती सावरण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही, पंचनामे सुरू आहेत, माहिती घेत आहोत, मदतीला सुरूवातही केली आहे़ आम्ही फक्त माहिती घेत बसणार नाही, आम्ही कुणालाही वाºयावर सोेडणार नाही असेही ते शेवटी म्हणाले़

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button