शहर
मालाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर
मालाड: मालाड येथील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या १६ वरून २६ वर पोहोचली आहे. सोमवारी मध्यरात्री जवळपास ३५ फूट उंच भिंत झोपड्यांवर कोसळली होती. सुमारे दीड ते दोन फूट जाडीच्या भिंतीखाली चिरडून आतापर्यंत २६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७० हून अधिक जण जखमी आहेत. जखमींवर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालय व जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे.


